
| मुंबई | कोरोनाच्या संकटात कोरोना योद्धे म्हणून डॉक्टर आपल्या जीवाची बाजी लावून आणि अक्षरशः आपले कुटुंबावर तुळशी पत्र ठेवून काम करत आहेत. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मानधनात मोठी वाढ केली आहे. बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे व त्यांचे मानधन समान करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे कोरोना विरुद्ध लढाईला निश्चितपणे बळ मिळणार आहे तसेच डॉक्टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.
अशी आहे वाढ :
- वाढीव मानधनानुसार आता, आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ₹६०,००० ऐवजी ₹७५,०००
- आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना ₹७०,००० ऐवजी ₹८५,०००
- इतर भागातील MBBS डॉक्टर्सना ₹५५,००० ऐवजी ₹७०,०००
- इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ₹६५,००० ऐवजी ₹८०,००० मानधन देण्यात येईल.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री