कोरोना योद्धे असणाऱ्या डॉक्टरांच्या मानधनात मोठी वाढ..!

| मुंबई | कोरोनाच्या संकटात कोरोना योद्धे म्हणून डॉक्टर आपल्या जीवाची बाजी लावून आणि अक्षरशः आपले कुटुंबावर तुळशी पत्र ठेवून काम करत आहेत. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मानधनात मोठी वाढ केली आहे. बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे व त्यांचे मानधन समान करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे कोरोना विरुद्ध लढाईला निश्चितपणे बळ मिळणार आहे तसेच डॉक्टर्सना सुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे.

अशी आहे वाढ :

  • वाढीव मानधनानुसार आता, आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ₹६०,००० ऐवजी ₹७५,०००
  • आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना ₹७०,००० ऐवजी ₹८५,०००
  • इतर भागातील MBBS डॉक्टर्सना ₹५५,००० ऐवजी ₹७०,०००
  • इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना ₹६५,००० ऐवजी ₹८०,००० मानधन देण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *