
कोरोना येवून आता ६० दिवसांपेक्षा जास्त काळ होवून गेलेला असून बऱ्याच घडामोडी या ६० दिवसांमध्ये या महाराष्ट्रात घडून गेलेल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची आणि मोठी घडामोड ; ज्याला की उलथापालथ ही म्हणता येईल ती म्हणजे परप्रांतीय मजुरांचे स्वगृही परतणे आणि त्यातून मुंबई, पुणे, नागपुर सारख्या मोठ्या शहरात निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी..
होय संधीचं….!
परप्रांतीयांच्या मुद्यावर शासनाला धारेवर धरत आलेला पक्ष म्हणजे मनसे आणि आता या मनसेने या संधीचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी मराठी तरूणाईला साद घातलेली आहे. भाजीपाला विकणे असो की घरोघरी दुध पोहचविणे… अनेक छोटी मोठी कामे परराज्यातील मजूर करत होती; ती कामे करण्यासाठी आता मराठी माणसांनी व विशेषतः तरूणांनी समोर येणे आवश्यक असल्याचे मत मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी विषद केलेले आहे. मुंबई महापालिकाचे विद्यमान नगरसेवक ते पक्के दादरकर असेलेले संदिप देशपांडे यांनी नुकतेच मनसेच्या एका कार्यकर्त्यांनी लावलेल्या भाजीपाला दुकानाला भेट दिली आणि त्या प्रसंगी त्यांनी प्रत्येक मराठी माणसाने ह्या रोजगाराच्या संधी हेरल्या पाहीजे आणि त्या हेरून कसलीही लाज न बाळगता धीरोदत्तपणाने प्रत्येक व्यवसायात उतरण्याचे धाडस दाखविले पाहिजे असे मत व्यक्त केले.
तमाम महाराष्ट्रामध्ये आज परप्रांतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना त्यापैकी बहुतांश लोक आपआपल्या राज्यात परतली असताना महाराष्ट्रातील तरुणाईने कष्ट करताना, नविन व्यवसाय करताना लाज नाही तर अभिमान बाळगा असे स्पष्ट मत मनसे सहित सगळेच पक्ष करू लागले आहेत.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पसरलेल्या तरुणाईने कोरोना संकटकाळात तयार झालेल्या या संधीचा फायदा घेणे महाराष्ट्र उभारणीसाठी उपयुक्त ठरणार आहे. हाच कोरोना काळातील आलेल्या संधीचे सोने करण्याचा मनसे मार्ग..!
– आशुतोष चौधरी, वरिष्ठ संपादक
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा