| नवी दिल्ली | भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये ताणतणाव सुरू आहे. दोन देशांच्या सैन्यात झालेल्या संघर्षानंतर दोन देशांकडून वास्तविक नियंत्रण रेषेवरील सैनिकांची संख्या वाढविली जात आहे. यावर आता तिबेटचे निर्वासित सरकारचे पंतप्रधान लोबसंग सांगेय यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.(Prime Minister Lobsang Sangey on ladakh)
तिबेटच्या निर्वासित सरकारच्या पंतप्रधानांनी सांगितले की, लडाख हा भारताचा भाग आहे. लडाख, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम हे भारताचे भाग आहेत. त्यांच्या शांततेबद्दल उपस्थित झालेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, दलाई लामा गेली ६० वर्षे आंतरराष्ट्रीय मंचात चीनविरुद्ध सतत बोलत आहेत. तिबेटवर चीननं कब्जा केल्यानंतर आम्हीही अडचणीत सापडलो आहोत. चीनने तिबेट ताब्यात घेतल्यानंतरच सीमेवरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता, असेही ते म्हणाले आहेत.तिबेटच्या निर्वासित झालेल्या पंतप्रधानांनी सांगितले की, तिबेट ताब्यात घेतल्यानंतर चीन तेथील मानवाधिकारांचे सतत उल्लंघन करीत आहेत. यामुळे आपण धर्मशाळेतच थांबलो आहोत. दलाई लामा यांना भारताचे पाहुणे म्हणून वर्णन करताना ते म्हणाले की, तिबेटला शांततेचे शस्त्र बनवावे, असा त्यांना नेहमीच विश्वास आहे. निर्धारित सीमेचा बचाव केला जावा. भारत कधीही आक्रमक झाला नाही. ज्याचा प्रत्येकाला हक्क आहे तो तो बचाव करीत आहे. पण चीन आक्रमक होत असल्यानं भारताला स्वत:च्या सीमांचा बचाव करण्यावाचून पर्याय नाही(.Prime Minister Lobsang Sangey on ladakh)
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री