| नवी दिल्ली | भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आता सुपर हायटेक विमान सज्ज झाले आहे. हे विमान आता अमेरिकेच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणा-या विमानांप्रमाणे सुरक्षित असणार आहे. येत्या सप्टेंबरच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एअर इंडिया वन’ च्या ताफ्यात दोन खास अपग्रेड केलेल्या बोईंग -७७७ विमानांमध्ये ‘सेल्फ प्रोटेक्शन सूट’ (एसपीएस) सज्ज असतील.
काय विशेष आहे यात :
या विमानात इन्फ्रारेड आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर तंत्रज्ञानाचा lसमावेश आहे. याव्यतिरिक्त, या विमानात क्षेपणास्त्रांची चेतावणी देणारी यंत्रणा असणार आहे. जी क्षेपणास्त्रांवर गोळीबार करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर, या विमानात शत्रूच्या रडार यंत्रणेला बाधा आणण्यास सक्षम तंत्रज्ञानासह सुसज्ज देखील असणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एअरफोर्स वनमध्ये या विमानांचे असलेले सुरक्षा उपाय देखील या विमानात असणार आहेत. एअर इंडियाने व्हीव्हीआयपी प्रवासासाठी नवीन बोईंग – ७७७ -३०० ईआर विमानांची एक जोडी डलास येथील अमेरिकेतील बोईंग सुविधा केंद्रात पाठविली होती. जिथे त्यांना क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा बसविण्यात येईल. यासाठी जवळपास सुमारे १४०० कोटी खर्च लागणार आहे.(narendra modi private plane)
विमानाच्या रेकॉर्डवरून असे दिसून आले आहे की, ‘दोन्ही विमाने तीन वर्षांपेक्षा कमी जुने होती आणि क्वचितच वापरली गेली आहेत. या नवीन एअर इंडिया वन विमानात ऑफिसची जागा, मीटिंग रूम आणि कम्युनिकेशन सिस्टम असणार आहे. शिवाय या विमानात इंधन न भरता भारत आणि अमेरिकेदरम्यान उड्डाण करण्याची सुविधाही असेल, अशी माहिती मिळाली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी या विमानांचा वापर केला जाणार आहे. .सध्या पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती एअर इंडियाचे बोईंग बी – ७४७ हे विमान वापरतात. ते जवळपास २० वर्ष जुने आहेत. राष्ट्रपतींना घेऊन जाणारे विमान जवळपास २६ वर्षे सेवेत आहेत.(narendra modi private plane)
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .