राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांसाठी नवीन विमान जवळपास १४०० कोटी रुपये खर्च..!

| नवी दिल्ली | भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आता सुपर हायटेक विमान सज्ज झाले आहे. हे विमान आता अमेरिकेच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणा-या विमानांप्रमाणे सुरक्षित असणार आहे. येत्या सप्टेंबरच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एअर इंडिया वन’ च्या ताफ्यात दोन खास अपग्रेड केलेल्या बोईंग -७७७ विमानांमध्ये ‘सेल्फ प्रोटेक्शन सूट’ (एसपीएस) सज्ज असतील.

काय विशेष आहे यात :
या विमानात इन्फ्रारेड आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर तंत्रज्ञानाचा lसमावेश आहे. याव्यतिरिक्त, या विमानात क्षेपणास्त्रांची चेतावणी देणारी यंत्रणा असणार आहे. जी क्षेपणास्त्रांवर गोळीबार करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर, या विमानात शत्रूच्या रडार यंत्रणेला बाधा आणण्यास सक्षम तंत्रज्ञानासह सुसज्ज देखील असणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एअरफोर्स वनमध्ये या विमानांचे असलेले सुरक्षा उपाय देखील या विमानात असणार आहेत. एअर इंडियाने व्हीव्हीआयपी प्रवासासाठी नवीन बोईंग – ७७७ -३०० ईआर विमानांची एक जोडी डलास येथील अमेरिकेतील बोईंग सुविधा केंद्रात पाठविली होती. जिथे त्यांना क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा बसविण्यात येईल. यासाठी जवळपास सुमारे १४०० कोटी खर्च लागणार आहे.(narendra modi private plane)

विमानाच्या रेकॉर्डवरून असे दिसून आले आहे की, ‘दोन्ही विमाने तीन वर्षांपेक्षा कमी जुने होती आणि क्वचितच वापरली गेली आहेत. या नवीन एअर इंडिया वन विमानात ऑफिसची जागा, मीटिंग रूम आणि कम्युनिकेशन सिस्टम असणार आहे. शिवाय या विमानात इंधन न भरता भारत आणि अमेरिकेदरम्यान उड्डाण करण्याची सुविधाही असेल, अशी माहिती मिळाली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकया नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी या विमानांचा वापर केला जाणार आहे. .सध्या पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती एअर इंडियाचे बोईंग बी – ७४७ हे विमान वापरतात. ते जवळपास २० वर्ष जुने आहेत. राष्ट्रपतींना घेऊन जाणारे विमान जवळपास २६ वर्षे सेवेत आहेत.(narendra modi private plane)

रविवारपासून नवी लेखमाला..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *