| नवी दिल्ली | श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसित मलिंगा हाच ‘यॉर्कर किंग’ असल्याची कबुली भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने दिली आहे.
लसित मलिंगा आणि जसप्रीत बुमरा हे दोघेही अत्यंत अचूक असा यॉर्कर चेंडू टाकण्यात सक्षम आहेत. या दोघांपैकी सर्वोत्तम कोण? असा प्रश्न चाहत्यांना नेहमीच पडतो. तसेच, या दोघांपैकी ‘यॉर्कर किंग’ कोण? असाही सवाल सामान्यपणे विचारला जातो. याचे उत्तर बुमराने स्वत:च देऊन टाकले आहे. ‘‘मलिंगा हाच प्रभावी यॉर्कर चेंडू टाकणारा गोलंदाज आहे. अनेक वर्षांच्या कारकिर्दीत तो त्याच वेगाने आणि अचूकपणे यॉर्करचा मारा करतो आहे. म्हणून तोच ‘यॉर्कर किंग’आहे. निर्णायक क्षणी हेच मलिंगाचे बलस्थान आहे’’, असे बुमराने सांगितले. (Who is the Yorker king)
‘यॉर्कर’ चेंडू टाकण्याचे कौशल्य कसे शिकला, याबाबतही बुमराने खुलासा केला आहे. ‘‘अनेकांना वाटते की, मलिंगाने मला यॉर्कर चेंडू कसा टाकायचा, ते शिकवले. पण ते चुकीचे आहे. त्याने मला मैदानावरील कोणत्याही गोष्टी शिकवल्या नाहीत. मी त्याच्याकडून काही शिकलो असेल तर ते म्हणजे विचार करण्याची पद्धत, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये गोलंदाजाने कशाप्रकारे विचार करावा, गोष्टी मनासारख्या घडत नसतील तरी गोलंदाजाने रागवायचे नाही, ठराविक फलंदाजासाठी ‘प्लॅन’ कसा आखावा, अशा काही गोष्टी मी त्याच्याकडून समजून घेतले आणि शिकलो, असे बुमराने एका मुलाखतीत सांगितले.
अचूक यॉर्कर चेंडू टाकण्याचे रहस्य बालपणीच्या खेळामध्ये दडले असल्याचे बुमराचे म्हणणे आहे. बुमरा म्हणाला की, ‘‘लहानपणी मी रबरी चेंडूने खेळायचो. त्याला शिवणीसारखे (सीम) डिझाईन असायचे. त्यामुळे ते चेंडू स्विंग व्हायचे. आम्ही जिथे खेळायचो; तिथे सीम मुव्हमेंट, विविध टप्प्यावरील गोलंदाजी किंवा यष्टीरक्षण अशा गोष्टी नसायच्या. केवळ चेंडू फलंदाजाच्या अंगावर टाकणे आणि पायात गोलंदाजी करून त्याला बाद करणे हाच आमचा उद्देश असायचा. तुम्हाला विकेट हवी असेल तर यॉर्कर चेंडू टाका, असा साधा नियम आम्ही लहानपणापासूनच शिकलो. ’’(Who is the Yorker king)
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .