| नवी दिल्ली | कोरोना विषाणूच्या साथीमुळे मार्चपासून दिल्लीतील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाईन अभ्यास घेतले जात आहेत, परंतु कुठेतरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.
त्यामुळे आता शाळेबद्दल दिलासादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या कित्येक आठवड्यांच्या गोंधळानंतर केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी सांगितले आहे की, ऑगस्ट २०२० नंतर शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू केली जातील. १५ ऑगस्ट २०२० नंतर शैक्षणिक संस्था उघडतील. डॉ.रमेश पोखरियाल यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘१५ ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.’ (school will start in August)
या संदर्भात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एचआरडी डॉ. रमेश पोखरीयाल निशंक यांना शाळा पुन्हा सुरू करण्याच्या योजनेवर पत्र पाठविले. काल त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. आपल्या पत्रात त्यांनी लिहिले की, ‘कोरोनाच्या सहअस्तित्वला स्वीकारण्याची आणि देशातील शाळांची भूमिका नव्याने ठरविण्याची वेळ आली आहे.’ शाळांना साहसिक भूमिकांसाठी तयार केले नाही तर ही आपली ऐतिहासिक चूक असेल, शाळांची भूमिका केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित राहणार नाही तर मुलांना जबाबदार आयुष्य जगण्यासाठी तयार करणे देखील आहे.(school will start in August)
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .
Good decision
योग्य निर्णय … 👍
योग्य निर्णय
लहान बालकांबाबत योग्य निर्णय घेतला जावा
Good decision
Good!!! Scolarship che pn result lava please