‘ शाळा ‘ या तारखेनंतर उघडणार, केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री यांची माहिती..!

| नवी दिल्ली | कोरोना विषाणूच्या साथीमुळे मार्चपासून दिल्लीतील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाईन अभ्यास घेतले जात आहेत, परंतु कुठेतरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.

त्यामुळे आता शाळेबद्दल दिलासादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्या कित्येक आठवड्यांच्या गोंधळानंतर केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी सांगितले आहे की, ऑगस्ट २०२० नंतर शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू केली जातील.  १५ ऑगस्ट २०२० नंतर शैक्षणिक संस्था उघडतील. डॉ.रमेश पोखरियाल यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘१५ ऑगस्टपर्यंत आम्ही सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न करीत आहोत.’ (school will start in August)

या संदर्भात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी एचआरडी डॉ. रमेश पोखरीयाल निशंक यांना शाळा पुन्हा सुरू करण्याच्या योजनेवर पत्र पाठविले. काल त्यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. आपल्या पत्रात त्यांनी लिहिले की, ‘कोरोनाच्या सहअस्तित्वला स्वीकारण्याची आणि देशातील शाळांची भूमिका नव्याने ठरविण्याची वेळ आली आहे.’ शाळांना साहसिक भूमिकांसाठी तयार केले नाही तर ही आपली ऐतिहासिक चूक असेल, शाळांची भूमिका केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित राहणार नाही तर मुलांना जबाबदार आयुष्य जगण्यासाठी तयार करणे देखील आहे.(school will start in August)

6 Comments

  1. लहान बालकांबाबत योग्य निर्णय घेतला जावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *