
| नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री केजरीवाल यांना ताप आणि खोकला येत असल्याने त्यांची आता कोरोना टेस्ट होणार आहे. त्यांच्या सर्व नियोजीत बैठका रद्द करण्यात आल्या आहेत. त्यानंतर त्यांनी कोणाचीच भेट देखील घेतलेली नाही. त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं असल्याचे देखील समजत आहे.
कालच दिल्लीतील केजरीवाल सरकारने दिल्लीतील रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीतील लोकांना उपचारासाठी दाखल केलं जाईल असा निर्णय घेतला होता. फक्त केंद्राच्या रुग्णालयांमध्ये बाहेरच्या राज्यातील लोकांवर उपचार केले जातील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वत: याची घोषणा केली होती. दिल्ली सरकारला दिल्लीकरांनी आणि डॉक्टर महेश वर्मा कमेटीने हा सल्ला दिला होता.(Kejriwal health issue)
दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या २७ हजार ६५४ वर पोहोचली आहे. मागील २४ तासात येथे १३२० रुग्ण वाढले आहेत. तर ७६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एकूण २१९ कंटेनमेंट झोन आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत एक जूननंतर रोज १२०० हून अधिक रुग्ण वाढत आहेत. (Kejriwal health issue)
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री