| मुंबई | जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण यांच्यानंतर राज्य मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाने गाठले असून त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत भगिनी पंकजा मुंडे यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने धनंजय यांच्याशी फोनवरून संपर्क साधला.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. ‘बंधू तब्येतीची काळजी घे, लवकर बरा होऊन घरी ये’ असे यावेळी पंकजा यांनी धनंजय यांना सांगितले. या निमित्ताने राजकारणापलीकडेही नाती महत्त्वाची असतात हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. .
बीडच्या राजकारणात पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे या बहिण-भावातील संघर्ष सातत्याने पाहायला मिळाला. सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत या संघषार्ने अगदी टोक गाठले होते. प्रचारात अत्यंत खालची पातळी गाठली गेली होती. परळीच्या लढाईत धनंजय यांनी बाजी मारत पंकजा यांना पराभूत केले होते. या साऱ्या संघषार्तून आलेली कटुता धनंजय यांच्या आजारपणाने दूर सारली गेली आहे. धनंजय यांच्या काळजीपोटी पंकजा यांनी लगेचच त्यांच्याशी संपर्क साधला.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .