| मुंबई | सीमेवर सुरू असलेल्या संघर्षामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी भारतात जोर धरत आहे. अशातच मोबाइलमधील चिनी अॅप्सनाही विरोध होतोय. चिनी अॅप्सना पर्याय म्हणून गेल्या दोन महिन्यांमध्ये बरेच मेड इन इंडिया अॅप लाँच झालेत, पण काही दिवसांपूर्वीच लाँच झालेलं एक अॅप सध्या चांगलंच लोकप्रिय ठरतंय.
रोपोसो (Roposo), मित्रों (Mitron) आणि बोल इंडिया (Bolo Indya) या अॅप्सनंतर आता Chingari नावाचं एक मेड इन इंडिया अॅप लाँच झालं आहे. विशेष म्हणजे लाँच झाल्यांनतर अवघ्या तीन दिवसांमध्येच या अॅपला पाच लाखांहून अधिक युजर्सनी डाउनलोड केल्याचा दावा ‘चिंगारी’च्या डेव्हलपर्सकडून करण्यात आला आहे. चिनी अॅप टिकटॉकला पर्याय असलेलं ‘चिंगारी’ अॅप बंगळुरूच्या बिस्वात्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी बनवलं आहे.
‘गेल्या ७२ तासांमध्ये आमचं अॅप जवळपास पाच लाख जणांनी डाउनलोड केलं. चिंगारीचं कुटुंब हळूहळू मोठं होतंय’, असं डेव्हलपर विश्वात्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी म्हटलं आहे. लाँच झाल्याच्या ३६ तासांमध्येच Chingari अॅप गुगल प्ले-स्टोअरच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये आलं होतं असा दावाही त्यांनी केला. हिंदी, इंग्रजीसह हे अॅप १० भाषांमध्ये उपलब्ध आहे.
प्ले-स्टोअरवर दिलेल्या माहितीनुसार, चिंगारी अॅपद्वारे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू शकतात आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअरही करु शकतात. यामध्ये ट्रेंडिंग न्यूज, मनोरंजन, फनी व्हिडिओ, लव स्टेटसचे व्हिडिओ मिळतील. चिंगारीवर शेअर केलेल्या पोस्टवर लाइक, कॉमेंट, शेअर करता येतील. व्हॉट्सअपवर शेअर करण्यासाठी वेगळा पर्याय आहे. एखाद्या युजरला फॉलो करण्याचाही पर्याय यामध्ये देण्यात आला आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .