
| मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या आरक्षण धोरणामूळे ओबीसी विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. अकोला येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यामूळे २०१७ पासून ओबीसीचे अकरा हजार विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित असल्याचा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
देश पातळीवरील ‘ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ऑदर बॅकवर्ड क्लासेस’नी ही आकडेवारी जाहीर केली. ‘नीट’द्वारे प्रवेशामध्ये ओबीसींचे २७ टक्के आरक्षण दिले नाही. भारतीय राज्यघटनेच्या ९३ व्या दुरूस्तीनुसार केंद्र शासनाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे. मात्र, नीटमार्फत होत असलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसींचे आवश्यक आरक्षण २०१७ पासून कमी केले आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील सर्वसामान्य विद्याार्थी वंचित राहिले आहेत, असे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
या मुद्द्यावर लवकरच राज्यभरात मोठं आंदोलन उभारू, असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे. या आंदोलनासाठी कोरोनाच्या नियमानांही झुगारून लावणार असल्याचा इशारा आंबेडकरांनी दिला आहे.
दरम्यान या पत्रकार परिषदेत त्यांनी चीन भारत संबंध, फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे, तर राज्यपाल यांची स्तुती केली आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री