नरेंद्र मोदींनी ओबीसी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान केले – प्रकाश आंबेडकर

| मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीच्या आरक्षण धोरणामूळे ओबीसी विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान झाल्याचा आरोप वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. अकोला येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यामूळे २०१७ पासून ओबीसीचे अकरा हजार विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित असल्याचा घणाघाती आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

देश पातळीवरील ‘ऑल इंडिया फेडरेशन ऑफ ऑदर बॅकवर्ड क्लासेस’नी ही आकडेवारी जाहीर केली. ‘नीट’द्वारे प्रवेशामध्ये ओबीसींचे २७ टक्के आरक्षण दिले नाही. भारतीय राज्यघटनेच्या ९३ व्या दुरूस्तीनुसार केंद्र शासनाने ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे. मात्र, नीटमार्फत होत असलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ओबीसींचे आवश्यक आरक्षण २०१७ पासून कमी केले आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील सर्वसामान्य विद्याार्थी वंचित राहिले आहेत, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

या मुद्द्यावर लवकरच राज्यभरात मोठं आंदोलन उभारू, असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला आहे. या आंदोलनासाठी कोरोनाच्या नियमानांही झुगारून लावणार असल्याचा इशारा आंबेडकरांनी दिला आहे.

दरम्यान या पत्रकार परिषदेत त्यांनी चीन भारत संबंध, फडणवीस यांच्यावर देखील टीका केली आहे, तर राज्यपाल यांची स्तुती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *