| मुंबई | बालभारती मराठी माध्यमाच्या इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील एका वाक्यावरून शुक्रवारी अचानक गोंधळ सुरू झाला. या पुस्तकातील पाठ क्र. २ मध्ये क्रांतिकारक राजगुरु यांच्या नावाऐवजी क्रांतिकारक ‘कुर्बान हुसेन’ असा उल्लेख का केला असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. इयत्ता आठवीच्या मराठीच्या पुस्तकात शिक्षण मंडळाने घोडचूक केल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाने देखील केला होता. भगतसिंह, राजगुरु यांच्यासह फाशीवर गेलेल्या तिसऱ्या क्रांतिकाराच्या नावात चूक असून सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. हा क्रांतिकारकांचा अपमान असल्याचं ब्राह्मण महासंघाचे प्रमुख आनंद दवे यांनी केला होता.
वास्तविक हे पुस्तक दोन वर्षांपूर्वी २०१८-१९ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. शिवाय पाठातील हे वाक्य मूळ पुस्तकातून जसेच्या तसे घेण्यात आले आहे. ते बदलण्याचा अधिकार समितीस नाही, असे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाचे म्हणणे आहे. हा पाठ ज्येष्ठ लेखक, साहित्यिक, विचारवंत आणि स्वातंत्र्यसैनिक यदुनाथ थत्ते यांच्या ‘प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील’ या पुस्तकावरून घेण्यात आला आहे.
ज्यांच्या नावावरून इतका गहजब सुरू आहे, ते कुर्बान हुसेन हे क्रांतिकारकच आहेत. याबाबत पाठ्यपुस्तक मंडळाने पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण दिले आहे. या पाठात कुर्बान हुसेन यांचे क्रांतिकारक म्हणून समाविष्ट केलेले नाव योग्य आहे. कारण कुर्बान हुसेन हे सोलापूरमधील स्वातंत्र्य सैनिक / सत्याग्रही होते. त्यांना १२ जानेवारी १९३१ रोजी सहका-यांसमवेत फाशी देण्यात आली होती. त्यामुळे एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून ते सर्वपरिचित आहेत. याबाबतची माहिती राज्य सरकारच्या सोलापूर जिल्हा संकेतस्थळावरदेखील आहे.
पाठ्यपुस्तक मंडळाच्या इतिहास इयत्ता आठवी या पाठ्यपुस्तकामध्येही पाठ क्र. ८ सविनय कायदेभंग मध्ये सोलापूर सत्याग्रहाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये कुर्बान हुसेन यांचे कार्य नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर पाठ्यपुस्तकात पाठ क्र. १० मध्ये सशस्त्र क्रांतिकारी चळवळमध्ये भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे, असे मंडळाने कळवले आहे.
‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ या पाठ्यपुस्तकातील प्रतिज्ञेतील तिस-या वाक्याच्या अनुषंगाने हा पाठ आहे. राष्ट्रप्रेम भावनेबद्दलचा आशय हा विद्यार्थी व शिक्षक यांच्या संवादातून स्पष्ट करण्यात आला आहे. या पाठात क्रांतिकारकांबाबतची माहिती अभिप्रेत नाही. देशप्रेम भावना जाणीव जागृतीबाबत वर्गातील विद्यार्थ्यांशी झालेला संवाद या पाठातून लेखकाने मांडलेला आहे. मूळ पुस्तकातील वाक्ये जशीच्या तशी या पाठात घेण्यात आली आहेत. त्यामुळे कुर्बान हुसेन या नावाचा उल्लेख चुकीने आला आहे, असे म्हणणे संयुक्तिक नाही. त्यामुळे या पाठातून कोणत्याही प्रकारची सामाजिक भावना दुखावण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, असे पाठ्यपुस्तक मंडळाचे म्हणणे आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .