हा आहे क्रिकेट जगतातील सर्वात हुशार खेळाडू , अंपायर सायमन टॉफेल यांनी केली स्तुती..!

| मुंबई | क्रिकेट सामन्यादरम्यान परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी शांत असतो. २००७ मध्ये टी-२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ मध्ये चँपियन्स ट्रॉफी – आयसीसीच्या या तीन स्पर्धा जिंकणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये धोनीने चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करताना ३ वेळा कप जिंकला आहे.

आयसीसीच्या एलिट पॅनलचे अंपायर सायमन टॉफेल यांनी नुकतेच महेंद्रसिंग धोनीचे कौतुक करत म्हटले आहे की, माजी भारतीय कर्णधार स्मार्ट क्रिकेट माईंड ठेवतो. धोनी हा क्रिकेट जगातील सर्वात हुशार खेळाडू आहे. मी असं तो भारतीय असल्यामुळे म्हणत नाहीये, कारण मला तो तसाच दिसला आहे. सायमन टॉफेल यांनी क्रिकेट वर्ल्डला सांगितले की, तो आश्चर्यकारकपणे रणनीती बनवणारा चिंतक आहे आणि त्याच्याकडे उत्तर क्रिकेट ब्रेन आहे. त्याचा स्वभाव आणि संयम आश्चर्यकारक आहे.

धोनीने ९० कसोटी सामन्यांमध्ये ३८.१ च्या सरासरीने ४८७६ धावा केल्या आहेत. त्याने ३५० एकदिवसीय सामन्यात १०७७३ धावा केल्या आहेत. धोनीने ९८ टी-20 मध्ये ३७.६ च्या सरासरीने १६१७ धावा केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *