
| मुंबई | आपल्याला इंटरनेटवर काही जरी शोधायचे झाले तरीही गुगलशिवाय सध्यातरी पर्याय नाहीय. गुगल हा प्रत्येकाच्या घरातील परिवाराचा एक भाग झाला आहे जणू..! कोणतीही वस्तू असेल की फोटो किंवा नोकरी तुम्हाला गुगलच त्या त्या संबंधित वेबसाईटची लिंक पुढ्यात आणून ठेवते. परंतू आता गुगल तुमची जॉब कन्सल्टन्सी होणार आहे. होय काहीसे असेच अॅप गुगलने भारतात लाँच केले आहे. ज्यावर कंपन्यांमध्ये असलेल्या नोकऱ्या थेट कळणार आहेत.
गुगलने कॉर्मो नावाचे अॅप लाँच केले आहे. हे असे अॅप आहे जे भारतातील करोडो बेरोजगारांना मदतगार ठरणार आहे. हे अॅप एन्ट्रीलेव्हल जॉब शोधण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
टेक क्रंचअनुसार गुगलने कॉर्मो जॉब्स हे अॅप पेमेंट सोल्यूशन गुगल पे मध्ये जॉब स्पॉटमध्ये जोडले आहे. भारतात हे अॅप जॉब स्पॉटच्या नावाने प्रसिद्ध केले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे गुगलने हे अॅप भारताचा छोटा शेजारी बांग्लादेशमध्ये २०१८ मध्ये लाँच केले होते. यानंतर इंडोनेशियामध्येही लाँच केले होते. आता हे अॅप भारतात आणण्यात आले आहे.
कंपनीच्या दाव्यानुसार हे अॅप गुगल पेद्वारे उपलब्ध असून झोमॅटो, डुंजोसारख्या अनेक कंपन्यांनी यावर २० लाखांहून अधिक नोकऱ्या पोस्ट केल्या आहेत. एकंदरीत गुगल भारताच्या एका मोठ्या बेरोजगार युवकांसाठी आशादायी ठरणार आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री