
| जळगाव | गेल्या दहा बारा वर्षात जन्माला आलेले नेते आता राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत असं म्हणत भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याच पक्ष नेतृत्वावर टीका करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचं कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल हे सांगता येत नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की, “निव्वळ मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का ? कोणत्या कारणासाठी ? याचा शोध मी घेत आहे. मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपाचं एकट्याच्या बळावर सरकार आणलं होतं. त्या कालखंडात आत्ता आहेत त्यातील अनेक लोक नव्हतेसुद्धा. हे अलीकडे १०-१२ वर्षात जन्माला आलेले राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवत आहेत.”.
“मी गेल्या चाळीस वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहे. पण पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना आहे. महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचं कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल हे सांगता येत नाही,” असंही खडसे यांनी म्हटलं आहे. कोरोनाचं सावट दूर झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
एकंदरीत, खडसे यांचे पक्षातून जाणीवपूर्वक खच्चीकरण केले असल्याची त्यांच्या चाहत्यांची भावना आहे. आपल्या कष्टाच्या जोरावर त्यांनी भाजपला तारले होते, परंतु आता त्यांची पक्षातील अवस्था थोडी वाईट आहे, याला जबाबदार माजी मुख्यमंत्री असल्याची जनमानसात भावना आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री