| सांगली | महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ या मोहिमेवर सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रित बहिष्कार टाकला होता. सांगली जिल्हा समन्वय समिती मार्फत शिक्षणाधिकारी यांना निवेदन देवून हा बहिष्काराचा निर्णय कळविण्यात आला होता. काल त्या बाबत समन्वय समितीची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी ऑनलाईन कॉन्फरन्स झाली. पुन्हा गुरुवारी बैठक होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. परंतु हा बहिष्कार आता मागे घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
शालेय शिक्षण विभागाने आणि शिक्षण आयुक्तालयाने आदेश देवून देखील शिक्षकांना कोविड कामातून कार्यमुक्त न केल्याने व या कामाच्या संदर्भाने निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी देखील केलेली टाळाटाळ पाहता हा बहिष्काराचा निर्णय सर्व शिक्षक संघटनांनी एकत्रित येऊन घेतला होता. समन्वय समितीच्या काल झालेल्या कॉन्फरन्स मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडा यांनी सद्यस्थिती पाहता हा बहिष्कार मागे घ्यावा, राष्ट्रीय आपत्ती मध्ये सरकारी कर्मचारी यांनी संयमाने भूमिका घ्यावी असे सांगत काही मागण्या मान्य करून कामावरील बहिष्कार तात्काळ मागे घेऊन काम करण्यास सांगितले असल्याची माहिती आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काल पत्र काढून काही मागण्या मान्य केल्या आहेत. हे आहे पत्रात :
कोरोना विषाणू (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथ रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शासनाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कामकाजानुसार उदा. “माझे कुटुंब – माझी जबाबदारी” इ. सर्वेक्षण कामी जिल्हयातील शिक्षकांची आवश्यकतेनुसार नियुक्ती करणेत येत आहे. सबब संदर्भीय विषयान्वये कोविड – १९ च्या अनुषंगाने, सदर कामकाजासाठी खालील बाबी विचारात घेऊन संबंधिताना वगळून नियुक्ती देणेत याव्यात.
✓ वय वर्षे ५० वरील शिक्षक / शिक्षिका
✓ स्वतः गंभीर आजाराने त्रस्त असणारे शिक्षक / शिक्षिका.
✓ एखादया शिक्षक / शिक्षिका यांच्या घरी कोविडा-१९ बाधीत रुग्ण असल्यास.
✓ स्तनदा माता/ गर्भवती स्त्रीया – अशा शिक्षिका.
✓ सर्व व्यवस्थापनाच्या (खाजगी / जि.प./म.न.पा) अनुदानित शाळांतील शिक्षक / शिक्षिका यांना समाविष्ठ करावे. आदेशित करावयाची शिक्षक/ शिक्षक संख्या समप्रमाणात असावीत.
✓ ज्यावेळी ज्या शिक्षिकांना कोविड – १९ सलंग्न कामकाज असेल तेव्हा उर्वरित शिक्षकांनी ऑनलाईन कामकाज पहावे.
✓ कामकाजाबाबत आदेश रोटेशन (आदलून – बदलून) पद्धतीने कमाल १० दिवसांकरिता असावा.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .