
| इंदापुर/ महादेव बंडगर | भिगवण येथील सुदर्शन ट्रेडर्स नावाच्या गोळ्या बिस्किटांची होलसेल विक्री करणाऱ्या दुकानाच्या काउंटरशेजारी ठेवलेल्या बॉक्समधील सात लाख रुपये रोख रकमेची कापडी पिशवी अज्ञाताने पाळत ठेवून लंपास केली आहे.याबाबत श्री. उत्तम विष्णू पन्हाळकर रा. भिगवन वार्ड क्र.4 तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांनी भिगवण पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली आहे.
सविस्तर वृत्त असे की, दिनांक 4 नोव्हेंबर रोजी श्री .पन्हाळकर हे सकाळी 7.45 वाजता दुकान उघडण्यासाठी आलेले होते. दुकान उघडल्यानंतर त्यांनी आपल्याकडे असलेली रोख रकमेची कापडी पिशवी दुकानाच्या काउंटर शेजारी असलेल्या बॉक्सवर ठेवली व ते दुकानासमोर असलेल्या पानटपरीवर गेले होते. त्या ठिकाणी ते गप्पा मारत उभे असतानाच अज्ञात चोरट्याने पाळत ठेवून पान टपरीच्या पाठीमागील बाजूने येऊन सदर पिशवी चोरुन काखोटीला मारली व तात्काळ तिथून पोबारा केला. याबाबतचे संपूर्ण चित्रण दुकानासमोर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेले आहे. भिगवण पोलिस अज्ञात चोराचा शोध घेत आहेत. पुढील तपास सहायक फौजदार श्री. काळे हे करीत आहेत.भिगवण मध्ये सकाळच्या वेळी अशा पद्धतीने घडलेल्या चोरीने अनेकांना धक्का बसला आहे. व्यापाऱ्यांनी या घटने मधून बोध घेऊन योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. अशा भावना लोक व्यक्त करू लागले आहेत.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री