| मुंबई | महाविकास आघाडीला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोकळेपणाने आपलं मत व्यक्त केलं. या तीनही नेत्यांच्या भाषणाची बोली हे नक्कीच सांगतेय की, सरकार विचारपूर्वक पावलं टाकतंय, आणि खेळीमेळीच्या वातावरणाने सरकार चाललं आहे.
यावेळी महाविकास आघाडी साकारणारे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं. ते अबोल असले तरी चतुर असल्याचं मत यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर शरद पवारांची उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही आणखी एक शाबासकी असावी.
तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जे यापूर्वी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते, त्यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. एकीकडे उद्धव ठाकरे हे घरातच बसून आहेत अशी टीका विरोधकाकंकडून होत आहे, मात्र अजित पवार म्हणाले, कोरोनाची माहिती घेऊन, यांनी एवढा अभ्यास केला की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे अर्धे डॉक्टर झाल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेत आणि काँग्रेसमध्ये जमेल का? असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी एक उदाहरण हमारे लोग आप को सताते तो नही, असं सोनिया गांधी या आपल्याला फोनवर सांगत होत्या, असं उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात सांगितल्याने महाविकास आघाडीची राजकीय नाती किती घट्ट होत आहेत याची कल्पना येईल.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .