मुंबई : द नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (NHAI) २० एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुलीला सुरूवात करणार आहे. याबाबत एनएचआयने पूर्ण तयारी केली आहे. सरकारने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रीय महामार्गावर २० एप्रिलपासून टोल वसुल केला जाणार आहे.
सरकारच्या या आदेशाला जीवनावश्यक वस्तू वाहतूकीशी जोडलेल्या लोकांनी विरोध दर्शवला आहे. सरकारने कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रव्यापी लॉकडाऊनच्या दरम्यान २५ मार्चपासून टोल वसुली थांबवली होती. यामुळे आवश्यक वस्तूंची ने-आण करणं सोईचं होईल.
एनएचआयच्या पत्राला उत्तर देताना मंत्रालयाने सांगितलं की, एनएचआयने ११ आणि १४ एप्रिलला पाठवलेल्या पत्रात टोल टॅक्स वसुली सुरू करण्याचं कारण सांगितलं. त्यातून २० एप्रिलनंतर राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुली करण्यास परवानगी दिली आहे.