
| मुंबई | एवढ्यात तरी भारतीय रेल्वेसेवा पूर्णपणे पूर्वपदावर सुरू करता येणार नाही असं रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोनामुळे सध्या रेल्वेसेवा देशभरातच मर्यादित स्वरुपात सुरू आहे. ती पूर्णपणे कधी सुरळीत होणार याची कोणतीही तारीख निश्चित नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
रेल्वेसेवा खंडित असल्यानं गेल्या वर्षीपेक्षा रेल्वेच्या उत्पन्नात 87 टक्क्यांची घसरण झाल्याचंही यादव यांनी सांगितलंय आहे. दरम्यान सध्या देशभरात 1089 विशेष रेल्वे धावत आहेत तर कोलकात्यात मेट्रो रेल्वे 60 टक्के मुंबईत 88 टक्के लोकल सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. तर उर्वरित सेवा हळूहळू सुरू कऱण्यात येईल असंही व्ही. के यादव यांनी म्हटले आहे.
कोरोनामुळे बंद रेल्वे सेवा कधी सामान्य होतील याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहे. लॉकडाउननंतर रेल्वे हळूहळू गाड्या सुरु करत आहे. पण कोरोनाचा धोका पूर्णपणे संपल्या नसल्याने रेल्वे अजून तरी संपूर्ण सेवा सुरु करण्याच्या तयारीत नाही.
भारतीय रेल्वे सध्या 1,089 मेल आणि एक्स्प्रेस गाड्या चालवित आहे. कोरोना महामारीपूर्वी रेल्वे 1768 गाड्या ऑपरेट करत होती. कोरोना साथीच्या काळात, विशेष गाड्यांची मागणी जास्त असल्यामुळे व जास्त प्रतीक्षा यादीमुळे 20 विशेष क्लोन गाड्या चालविल्या गेल्या आहेत. ते म्हणाले की, उत्सवाच्या हंगामात गर्दी कमी करण्यासाठी 618 विशेष गाड्या चालविण्यात आल्या.
लोकल ट्रेन किंवा छोट्या मार्गाच्या गाड्यांविषयी बोलताना ते म्हणाले की, सर्व झोनच्या मुख्य अधिकाऱ्यांना त्यांच्या झोनमध्ये आणखी गाड्या चालवण्याची गरज आहे की नाही याबाबत राज्य सरकारशी बोलण्यास सांगितले आहे. आवश्यक असल्यास अधिक गाड्या चालवल्या जातील.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री