| मुंबई | अमेझॉननंतर मराठीच्या मागणीला घेऊन मनसेनं मोर्चा पश्चिम रेल्वेकडे वळवलाय.पश्चिम रेल्वेनं माहिती पत्रकं आणि जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करावा अशी मनसेची मागणी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांची पश्चिम रेल्वेला पत्र पाठवून ही मागणी केलीय. मागणी तात्काळ पूर्ण न झाल्यास रेल्वे प्रशासनाविरोधात मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा जितेंद्र पाटील यांनी दिलाय.
महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी आग्रही असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यानंतर अमेझॉन आता मराठी भाषा बोलू लागणार आहे. अमेझॉनच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा अशी मागणी केली होती. मनसेच्या या भूमिकेची अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजॉस यांनी दखल घेतलीय. अमेझॉन.इन या अॅपमध्ये मराठी भाषेला प्राधान्य द्या अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती. काही दिवसातच ही मागणी मान्य करण्यात आली असून येणाऱ्या दिवसात तुम्हाला अमेझॉन मराठीतून दिसणार आहे.
अमेझॉनला मराठी भाषेच्या वापरासंदर्भात मनसेचे अखिल चित्रे यांनी ई-मेल पाठवला होता. बेजॉस यांच्या वतीनं ‘अमेझॉन.इन’च्या जनसंपर्क विभागाने त्यास प्रतिसाद दिलाय. ‘बेजॉस यांना आपला मेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपमधील त्रुटींमुळं आपल्याला जो मनस्ताप झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत असे या पत्रात म्हटलंय.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .