| अहमदनगर | अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक स्वराज्य मंडळाची जिल्हा कार्यकारिणी सहविचार सभा संस्कृती मंगल कार्यालय, अहमदनगर येथे जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली.
कुणालाही भगदाड पाडून, दुसऱ्याच्या घरात माती कालवून मोठे होणारे आपले मंडळ नाही. आपण एका विचाराने एकत्र आलेलो आहोत, कुणातून फुटून येऊन आपण आपला खोटेपणाचा डोलारा उभा केलेला नाही, त्यामुळे नैतिक आधारावर आणि नवा खरा खरा बदल अपेक्षित असणारे सभासद स्वराज्य मंडळालाच भरभरून प्रतिसाद देत असल्याचे प्रत्येक तालुक्यातील शिलेदारांनी आपल्या भावना व्यक्त करताना मत मांडले-
मिशन 21: कुणाकडून जागा घेत कुणाशीही युती नाही- जिल्हाध्यक्ष सचिन नाबगे यांचा पुनरुच्चार.
भरगच्च तरुणाईची संख्या असलेल्या स्वराज्य मंडळाला सोबत घेण्यासाठी अनेक प्रस्थापित मंडळे मनाशी इच्छा बाळगून असल्याचे दिसत आहे. परंतु कुणासोबत जाऊन केवळ सत्ता हे ध्येय गाठायचे नसून सभासदांना खऱ्या लाभाचे पात्र बनवण्याचे स्वप्न उरी बाळगण्याचे स्वप्न स्वराज्य मंडळाने पाहिलेले आहे. त्यामुळे आजवर कुणी काय केले हे इतिहास सर्वांना सांगण्यात वेळ न दवडता स्वराज्य मंडळ सभासदांना आपण बँकेचे खरे मालक असल्याचा वास्तव अनुभव देत, त्यांच्या मनात असलेली बँक वास्तवात उरवण्याचा विडा उचलून काम करणार असल्याचा ठराव सभेत मांडण्यात आला.
सर्वाधिक कर्ज ते सर्वात कमी व्याजदर देणारी राज्यातील पहिली बँक बनवणार :
राज्यातील रयत बँक ते औरंगाबाद पर्यंतच्या सर्व शिक्षक बँकांचा अभ्यास करून आपली बँक सर्वोच्च बनवत इतर बँकांना आदर्शवत वाटणारी बँक बनवण्याचा निर्धार यावेळेस व्यक्त करण्यात आला. कायमठेव व व्याज यावर दरवेळी होणारे सर्वसाधारण सभेतील वादावर एकाचवेळी तोडगा काढणार असल्याचे नियोजन स्वराज्य मंडळ देणार असल्याने सभासदांना वारंवार याचक बनवायला लागणार नाही याची खात्री देण्याचे शिलेदारांनी मनाशी ठरवले.
ऑनलाइन व कोअर बँकेचा खरा अर्थ सभासदांना प्रत्यक्षात दाखवणार :
गेल्या 8 वर्षांपासून शिक्षक बँक कोअर प्रणाली कार्यरत झालेली असल्याचे बोलले जाते, पण या शाखेतून त्या शाखेत रक्कम पाठवायला अनेकदा मर्यादा घातल्या जातात, अनेकदा नेटवर्क डाऊन होते अशा अनेक समस्यांना सभासदांना सामोरे जावे लागते. मात्र स्वराज्य मंडळ खराखुरा आणि विनासायास सभासदांना घरबसल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे.
बँकेचे कामधेनू स्वरूपाचे वैभव पुन्हा प्राप्त करून देणार :
गेल्या 5 ते 10 वर्षत सभासद इतर बँकांचा कर्जासाठी विविध पर्यायाचा विचार करत असल्याचे दिसत आहे, त्यात विशेषतः गृहकर्ज, वाहन कर्ज, सोनेतारण कर्ज, अशी अनके कारणे आहेत. रेंगाळलेली एटीएम सुविधा, पडून आसलेल्या ठेवी, शाखांची दुरवस्था, गृहकर्ज देण्याची पद्धत, चक्रवाढ व्याज आकारणी पध्द्त, सभासदांना दिली जाणारी वागणूक, आपला परका असा भेद करणारे लोक यामुळे बँकेपासून दुरावलेला सभासद आपल्या बँकेकडे आनंदाने वळावा यासाठी अशा अनेक गोष्टी नीट करत सभासदांना आपली बँक ही कामधेनू असल्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही असे काम स्वराज्य मंडळ करणार असल्याचे स्वप्न स्वराज्य मंडळ शिलेदारांनी बघितले आहे.
वरील सर्व मते सचिन तपासे, प्रशांत गवारी, विनोद देशमुख, संतोष हजारे सर, योगेश राणे, सय्यद तौसिफ, सचिन गांडोळे, अशोक साळवे, रवींद्र भालेराव, प्रदीप बागुल, सुभाष भांड, अरुण पठाडे, विजय शिंदे, जयवंत ठाणगे, अमोल साळवे, नितीन भोईटे, शरद गावडे, राहुल लिमकर, नाना गाढवे या सर्व जिल्हाभरातून आलेल्या शिलेदारांनी तालुक्याच्या भावना मांडत स्वराज्य मंडळाची रणनीती कशी असावी, बँकेत होणाऱ्या बदलाची दिशा यावर आपली मते मांडली.
सहविचार सभेच्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मंडळाचे अध्यक्ष श्री. सचिन नाबगे, राजेंद्र ठोकळ, योगेश थोरात, प्रतीक नेटके, ज्ञानेश्वर सोनवणे, भाऊ पाचारने, सतीश पटारे, मच्छीन्द्र भापकर यांनी दिली.
जिल्हाभरातून सहविचार सभेला प्रल्हाद कोंडार, पोपट लोहकरे, अर्जुन तळपाडे, सुनील मेचकर, भास्कर तातळे, कैलास धिंदळे, राजेंद्र साबळे, अमोल सुकटे, गुरुनाथ लांघी, सदानंद चव्हाण, प्रशांत गवारी, सचिन तपासे, रोहिदास जाधव, प्रतीक नेटके, अमोल साळवे, प्रविण झावरे , जयवंत ठाणगे, संदिप गायकवाड, सोन्याबापू भांड, आशिष पठारे, राजू खरमाळे, बांडे सर, अरूण राहिंज, विनोद देशमुख, संतोष हजारे, राज कदम, सुभाष लवांडे, गोविंद रूपनर, मच्छीन्द्र भापकर, भाऊसाहेब पाचारणे, अरूण पठाडे, संदिप बडे, विजय म्हस्के, अमोल शेवाळे, विजय शिंदे, नितीन भोईटे, भाऊसाहेब गिरमकर, शरद गावडे, अमोल ससाणे, शरद टकले, जय ढोले, कुंदन साळवे ,भास्कर, खोदडे श्रीयुत लाटे ,दिलीप जाधव , शिंदे सर ,युवराज लवटे ,रामदास पानसरे सर,नाना गाढवे,अरविंद थोरात, सय्यद तौसिफ, सुभाष भांड, नितीन दळवी, विशाल कुलट, दीपक पवार, दीपक पवार, प्रकाश मुरकुटे, शंकर साबळे, सचिन गांडोळे,रवींद्र भालेराव, अशोक साळवे, प्रदीप उकांडे, बाबुराव सुपे, अण्णासाहेब शिंदे, विकास खेबडे, केशव बाळसराफ, संजय साबळे, गणेश शेंगाळ, प्रदीप बागुल निलेश राजवाळ, एकनाथ रहाटे, योगेश राणे, प्रदीप दळवी, चंद्रकांत पंडित, सोमनाथ शेंडे आदी शिलेदार उपस्थित होते.
आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे नेते आदरणीय ज्ञानेश्वर सोनवणे सर हे होते. सभेचे प्रास्ताविक मच्छीन्द्र भापकर सर यांनी केले. सदाबहार सूत्रसंचालन करत विकास खेबडे सर यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली तर कार्यक्रमाचे संपूर्ण यशस्वी नियोजन करणारे नाना गाढवे सर व अरविंद थोरात सर यांनी आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .