- दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : मंगळवार , २१ एप्रिल
ठाणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर व जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून ठाणे शहर व जिल्ह्यातील नागरिकांसाठी टेलीमेडिसिन अंतर्गत स्वतःच्या घरातूनच थेट व्हिडिओ कॉल द्वारे डॉक्टरांशी संपर्क साधून ऑनलाईन तपासणी आणि उपचार करण्याची सुविधा सुरु करण्याचा निर्णय राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री मा ना श्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. ही सुविधा ठाणेकरांसाठी सोमवार, 13 एप्रिल पासून उपलब्ध झाली आहे.
दिल्ली येथे आम आदमी मोहल्ला क्लिनिक योजना यशस्वीपणे राबविलेल्या MedOnGo Health Pvt Ltd आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणारा अशा प्रकारचा हा नावीन्यपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
ठाणे शहर – जिल्ह्यातील नागरिकांना कसा घेता येणार लाभ?
गुगल प्ले स्टोर वरून MedOnGo smart health
हे आप्लिकेशन डाउनलोड करून आणि घरी बसून आपली कोरोना कोविडं 19 ची संभाव्यता तपासता येणार आहे. सोबतच थेट व्हिडिओ call करून नागरिक यादीमधील उपलब्ध तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी करून घेऊ शकतात.
सध्या covid 19 च्या संसर्गामुळे सर्व शासकीय तसेच महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या मनुष्यबळा वर मोठा ताण आलेला आहे, या नवीन सुविधेमुळे घर बसल्या थेट खासगी क्षेत्रातील डॉक्टरांशी संवाद साधून उपचार करून घेता येणार असल्याने ही सुविधा फारच मोलाची ठरणार आहे.
या उपक्रमामुळे सद्यस्थितीत महत्त्वाचे ठरणारे सोशल डिस्टांसिंग राखलं जाईल व रुग्णांबरोबरच डॉक्टरांचे आरोग्य देखील सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. ही सेवा मोफत असून सर्व नागरिकांची आपल्या गूगल प्ले स्टोर वरून उपरोक्त अॅपप्लिकेशन डाउनलोड करून याचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाण्याचे पालकमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे यांनी केले आहे.
ही आहे त्या अॅपची लिंक..!
https://play.google.com/store/apps/details?id=com.medongo.patientApp