- दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल
|ठाणे| गृहनिर्माण मंंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना ठाण्यातल्या ज्यूपिटर या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पीटीआयने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.
गेल्या आठवड्यात आव्हाड कोरोनाबाधित पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी देखील केली होती. माझी चाचणी निगेटीव्ह आली आहे, असं ट्विट करून त्यांनी संबंध महाराष्ट्राला देखील सांगितलं होतं. त्यानंतर आता जवळपास १३ दिवसांनंतर आव्हाडांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आल्यानंतर होम क्वारंन्टाईन होण्याचा निर्णय घेतला होता. होम क्वारंटाईन असताना देखील ते ट्विटरवरून महाराष्ट्राच्या संपर्कात आहेत. दरम्यान, खबरदारीचा भाग म्हणून त्यांच्या काही तपासण्या करण्याकरिता त्यांना रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. आज त्यांच्या तपासण्या होणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे..