- दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल..
| ठाणे | राज्यभरात कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला असून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आदीं शहरांमध्ये देखील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणुचा फैलाव कमी व्हावा, कोरोनाग्रस्त रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत तसेच कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हावी यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजना राबवत आहेत. त्याचाच एक भाग जिल्हा सरकारी रुग्णालयांसोबतच अनेक खाजगी रुग्णालये कोविड-१९ रुग्णालये म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
कल्याण लोकसभा मतदार संघातील डोंबिवली येथील निऑन हॉस्पिटल या सर्व सुविधांनी सुसज्ज अशा खाजगी रुग्णालयासोबत कडोंमपाने भाडेतत्वावर घेतले असून करारानुसार या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन महापालिकेकडून दिले जाणार असल्यामुळे येथील कोरोना रुग्णांवर उपचार विनामुल्य होणार आहेत.
याच धर्तीवर ठाणे मनपा प्रशासनाने देखील कोरोनाग्रस्त रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी ठाणे मनपा क्षेत्रातील सर्व सुविधांनी सुसज्ज अशी खाजगी रुग्णालये भाडेतत्वावर घेऊन कोविड-१९ रुग्णालय म्हणून सुरु करावीत, जेणे करुन ठाणे मनपा परिक्षत्रातील मुंब्रा -कौसा सारख्या अनेक भागात रहात असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटाकांना याचा फायदा होईल.
यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी ठाणे मनपा महापौर श्री.नरेशजी म्हस्के तसेच ठाणे मनपा आयुक्त श्री. विजयजी सिंघल यांना निवेदन देत मागणी केली आहे.