आरोग्य सेतू अॅप गुगलवर नंबर एक..!


  • तुमच्यामध्ये कोरोनाची लक्षणं असू शकतात का, आहेत का हे आरोग्य सेतू अँप सांगतं.
  • भारतात ८२ टक्के युझर्सनी या अॅंपला ५ स्टार रेटींग दिलं आहे.

मुंबई : कोरोना बद्दल जनजागृतीसाठी आरोग्य सेतू अँप डाऊनलोड करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले होते. या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याने अनेक रेकॉर्ड केले आहेत. हे अँप तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला कोरोना व्हायरसबाबतच्या धोक्यापासून अलर्ट करेल आणि तुम्ही कोरोनापासून सुरक्षित आहात की नाही हे सांगते.

गुगलवर नंबर वन
आरोग्य सेतू अँप हे गुगल प्ले स्टोअरवर सर्वाधिक डाऊनलोड करण्यात आलेले अँप आहे. या अँपचं वैशिष्ट्य असं की अँप लॉन्च केल्यानंतर काही दिवसांतच हे अँप एक कोटीहून अधिक लोकांनी डाऊनलोड केलं आहे. अवघ्या काही दिवसांत आरोग्य सेतुने फेसबुक, टिकटॉक आणि व्हॉट्सएपला मागे टाकले आहे. १५ दिवसांच्या आत आरोग्य सेतू अँपने ऐतिहासिक रेकॉर्ड केलाय. याला कोट्यावधी युझर्सने डाऊनलोड केलंय. भारतात ८२ टक्के युझर्सनी या अॅंपला ५ स्टार रेटींग दिलं आहे.

या अँपमध्ये सेल्फ टेस्टचा पर्याय आहे, ज्यात तुमच्या आरोग्याची माहिती मागितली जाते. या माहितीच्या आधारे तुमच्यामध्ये कोरोनाची लक्षणं असू शकतात का हे अँप सांगतं. हे अँप तुमचा तपशील सरकारला पाठवतं. त्यानंतर गरज असेल तर आरोग्य मंत्रालयाकडून तुमच्यासाठी आयसोलेशन प्रक्रिया सुरु केली जाईल. हे अँप अशा रितीनं बनवलं आहे की जर एखादा अँप युजर आपल्या जवळच्या भागात असेल आणि त्याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली असेल तर किंवा त्याच्यात कोरोनाची लक्षणं असतील तर त्याची माहिती आपल्याला नोटीफिकेशनद्वारे दिली जाईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *