अबब..! वर्षाला इतकी दारू पितात मद्यपी..!



| मुंबई | देशभरात लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला ४ मे पासून सुरुवात झाली. यासोबतच ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील कन्टेंन्मेंट क्षेत्र वगळता मद्यविक्रीला देखील सुरुवात झाली. काल राज्यात तीन ते चार लाख लिटर दारुची विक्री झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.

कांतीलाल उमाप म्हणाले की, “एरव्ही राज्यात दिवसाला २४ लाख लिटर दारुचं सेवन केलं होतं. राज्यात कालपासून मद्यविक्रीला सुरुवात झाली. तरीही काल सगळीकडे दारुची दुकानं सुरु केलेली नव्हती. अजूनही काही जिल्ह्यात विक्रीला सुरुवात झालेली नाही. राज्यात काल तीन ते चार लाख लिटर दारुची विक्री झाल्याचा अंदाज आहे. म्हणजे जवळपास १० ते ११ कोटी रुपयांची दारु विकल्याचा अंदाज आहे.

दारू आणि महसूल:

  • राज्यात दिवसाला २४ लाख लिटर दारुचं सेवन होतं.
  • वर्षाला राज्यात ८६.७ कोटी लिटर दारुचं सेवन केलं जातं..
  • त्यात ३५ कोटी लिटर देशी दारु, २० कोटी लिटर विदेशी दारु, ३१ कोटी लिटर बिअर आणि ७० लाख लिटर वाईनचा समावेश आहे.
  • २०१९-२० या आर्थिक वर्षात राज्याला दारुतून १५ हजार ४२८ कोटी महसूल मिळाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *