मालेगाव नंतर उत्तर महाराष्ट्रात हे शहर कोरोना हॉटस्पॉट..!| मुंबई | राज्यातील प्रमुख शहर समजल्या जाणाऱ्या मुंबई, पुण्याला कोरोनाने विळखा घातला आहे. त्यानंतर आता छोट्या छोट्या जिल्ह्यातही कोरोनाचा कहर वाढत आहे. गेल्या ३ दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याचे दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनलं आहे. आज जळगावमध्ये ३२ जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यातील सर्वाधिक ३१ रुग्ण हे अमळनेरमधील आहेत.

त्यामुळे अमळनेरमधील कोरोनाबाधितांचा आकडा १०० झाला आहे. तर जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १५७ वर पोहोचला आहे.

जळगाव जिल्ह्यात आज आणखी ३२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव शहरातील स्वॅब घेतलेल्या १०३ कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल घेण्यात आले होते. त्यातील ७१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर ३२ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आढळलेल्या या रुग्णांमध्ये चोपडा तालुक्यातील अडावद येथील एक आणि अमळनेर येथील ३१, अशा एकूण ३२ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५७ इतकी झाली आहे. तर दुर्देवाने यातील १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

अमळनेरात समूह संसर्ग झाला आहे का? याची चर्चा सध्या सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर हे कोरोनाचे हॉट्स्पॉट ठरत आहे. या शहरातील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या साततत्याने वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी समूह संसर्गाला सुरुवात झाल्याची भीती व्यक्त होत आहे. अमळनेरातील कोरोनाबाधितांची संख्या शुक्रवारी ६९ होती. त्यात आज पुन्हा ३१ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे ही संख्या १०० वर पोहोचली आहे.

दरम्यान, काल पाचोरा शहरात देखील एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. हा अहवाल प्रशासनाला रात्री उशिरा प्राप्त झाला होता.

जळगावमध्ये कुठे किती रुग्ण

शहर – रुग्ण – मृत्यू (कंसात)

अमळनेर – १०० (८)
भुसावळ – २१ (४)
जळगाव – १४ (२)
पाचोरा – १५ (३)
चोपडा – ५ (१)
मलकापूर – १
बुलडाणा – १
एकूण – १५७ (१८)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *