| मुंबई | गलवान खो-यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर लडाख सीमारेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहेत. गलवान खो-यातील चकमकीत भारतीय सैन्यातील २० जवानांना वीरमरण प्राप्त झाले. त्यानंतर, देशभराती चीनविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, भाजपातील काही बड्या नेत्यांचेच चीनशी व्यवसायिक संबंध असल्याचे उघड झाले आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.
विदेशमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या संस्थेला चीनकडून ३ कोटीच्या आसपास अनुदान. अजित डोवालांच्या संस्थेचे ९ चिनी संस्थांशी घनिष्ठ संबंध. आणि आमचे स्वयंघोषित देशभक्त निघाले चिनी मालावर बहिष्कार टाकायला!https://t.co/9QDXvUVHtd
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 28, 2020
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करत भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आणि पराराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या संस्थेला चीनकडून ३ कोटी रुपयांच्या आसपास निधी मिळाला आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा यंत्रणेचे सल्लागार अजित डोवाल यांच्या संस्थेचे ९ चिनी संस्थांशी जवळून संबंध असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. एकीकडे आपण चीनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी करतो, त्यासंदर्भात जनजागृतीसाठी आंदोलने करतो. विशेष म्हणजे अनेक दिग्गजांनी आणि भाजापा नेत्यांनीही चीनी मालावर बहिष्कार करण्याचे आवाहन केलंय. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही चायना मालावर बहिष्कार करण्याचे सूचवत, सैन्य दलाच्या कँटींनमध्ये केवळ स्वदेशी वस्तुंचा वापर करण्याचे आदेशच दिले आहेत. मात्र, भाजपा नेत्यांच्या दुटप्पीपणा यातून दिसून येत आहे.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या मुलाची द ऑब्जरव्हर रिसर्च फाऊंडेशन या संस्थेला चीनी संस्थेकडून निधी मिळालेला आहे. त्यासोबतच कोलकाता येथूनही २०१६ मध्ये या संस्थेला निधी मिळाला असून रिलायन्स उद्योग समुहाचं पाठबळही या संस्थेला आहे. तर, विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन या संस्थेचे ९ चीनी संस्थांशी जवळून संबंध असल्याचे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर म्हटले आहे. विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन ही संस्था राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची असून परराष्ट्रनिती व धोरण संदर्भात ही संस्था काम करते. डोवाल हे या संस्थेचे संचालक असून या संस्थेच भाजपा आणि आरएसएसच्या बड्या हस्तींचे शेअर असल्याची माहिती आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .