अजित डोवाल यांच्या संस्थेचे ९ चिनी संस्थांशी जवळून सबंध..!

| मुंबई | गलवान खो-यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर लडाख सीमारेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहेत. गलवान खो-यातील चकमकीत भारतीय सैन्यातील २० जवानांना वीरमरण प्राप्त झाले. त्यानंतर, देशभराती चीनविरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून चीनी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, भाजपातील काही बड्या नेत्यांचेच चीनशी व्यवसायिक संबंध असल्याचे उघड झाले आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करत भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आणि पराराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या संस्थेला चीनकडून ३ कोटी रुपयांच्या आसपास निधी मिळाला आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा यंत्रणेचे सल्लागार अजित डोवाल यांच्या संस्थेचे ९ चिनी संस्थांशी जवळून संबंध असल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. एकीकडे आपण चीनी मालावर बहिष्कार टाकण्याच्या गोष्टी करतो, त्यासंदर्भात जनजागृतीसाठी आंदोलने करतो. विशेष म्हणजे अनेक दिग्गजांनी आणि भाजापा नेत्यांनीही चीनी मालावर बहिष्कार करण्याचे आवाहन केलंय. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनीही चायना मालावर बहिष्कार करण्याचे सूचवत, सैन्य दलाच्या कँटींनमध्ये केवळ स्वदेशी वस्तुंचा वापर करण्याचे आदेशच दिले आहेत. मात्र, भाजपा नेत्यांच्या दुटप्पीपणा यातून दिसून येत आहे.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या मुलाची द ऑब्जरव्हर रिसर्च फाऊंडेशन या संस्थेला चीनी संस्थेकडून निधी मिळालेला आहे. त्यासोबतच कोलकाता येथूनही २०१६ मध्ये या संस्थेला निधी मिळाला असून रिलायन्स उद्योग समुहाचं पाठबळही या संस्थेला आहे. तर, विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन या संस्थेचे ९ चीनी संस्थांशी जवळून संबंध असल्याचे त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर म्हटले आहे.  विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन ही संस्था राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची असून परराष्ट्रनिती व धोरण संदर्भात ही संस्था काम करते. डोवाल हे या संस्थेचे संचालक असून या संस्थेच भाजपा आणि आरएसएसच्या बड्या हस्तींचे शेअर असल्याची माहिती आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *