या वर्षीच्या सर्व बदल्या रद्द कराव्यात..!
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची राज्य सरकारकडे मागणी..!


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल.

| मुंबई | सध्या कोरोनामुळे देश आणि राज्यातील परिस्थिती गंभीररित्या भयावह झालेली आहे, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री अतिशय खंबीरपणे राज्य शासनाचा गाडा कुशलतेने हाकत आहेत. या सर्व परिस्थितीत राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी देखील खांद्यास खांदा लावून योग्य साथ देत आहेतच.

या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचा-यांच्या दरवर्षी होणारे बदल्यांचे सत्र या वर्षापुरते रद्द करावे अशी मागणी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या बाबत अधिक माहिती देताना संघटनेचे सचिव अविनाश दौंड यांनी सांगितले की, ही बदलीची प्रक्रिया या वर्षी थांबवणे आवश्यक आहे. कारण,
१) राज्यात संचारबंदी लागू झाल्यामुळे सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना बदलीच्या ठिकाणी प्रवास करावा लागेल. अनेक प्रकरणी तर जिल्हा बदल अपेक्षित असल्याने सध्या ही प्रक्रिया जिकिरीची ठरेल.
२) या भयावह संकटाने राज्याच्या अर्थकारणावर अतिशय विपरीत परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत शासनसेवेत असलेले १९ लक्ष कर्मचारी आणि अधिकारी यांपैकी प्रतिवर्षाप्रमाणे २०% बदल्या अपेक्षित आहेत. त्यावरून हि संख्या सुमारे ४ लक्ष कर्मचारी एवढी होते. सरासरी एका बदलीकरीता रू.२०,०००/- बदली भत्ता खर्च गृहीत धरला तरी ४,००,००० गुणिले रू.२०,०००/-म्हणजे अंदाजे रू ८,००,००,००,००० (आठशे कोटी रुपये) एवढा खर्च होतो. ही रक्कम कोरोना विरूद्धच्या लढाईत आरोग्य यंत्रणेवर खर्च करता येईल.
३) तसेच कोरोनाची साथ असतांनाही मंत्रालयासह अनेक शासकीय विभागांच्या मुख्यालयात, संचालनालय आणि आयुक्तालय येथे केवळ बदल्यांचे आदेश काढण्याच्या तयारीसाठी कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे सर्व टाळता येण्यासारखे आहे.

एकंदरीत, वरील मुद्द्यांबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील अशी आशा संघटनेचे पदाधिकारी मिलिंद सरदेशमुख यांनी देखील व्यक्त केली आहे. 


8 Comments

  1. जिलहा अतरगत करायला हरकत नसावी वाटते।

    1. विनंती वरील बदली करण्यासाठी हरकत नसावी

  2. जिलहा अतरगत करायला हरकत नसावी वाटते। internal jilla for class three badli should be cancelled. At least50 percent badli should be done. This my mathh. Thankyou sir

  3. बदली भत्ता देऊ नका पण बदली द्या ती काही लोकांना गरजेची आहे

  4. साहेब, जे गेली 4 वर्षे कुटुंबापासून 1200 की. मी. दूरवर आहेत, त्यांचे पती – पत्नी एकत्रीकरण प्रतीक्षेत आहे, मधुमेह आणि हृदयरोग विकाराने ग्रस्त आहेत अशांना काय मरायालाच आहे तेथे ठेवणे संयुक्तिक होईल.

  5. काही लोक अडचणीत आहेत. घरी आई वडील आजारी आहेत त्याना विनंती बदली मिळायला हवी.कारण 800 ते 900 km लांब राहतात भरपूर जण त्यांचं काय अजून 1 वर्ष लागला तर

  6. सगळ्या बदल्या जिल्ह्याबाहेर होत नाहीत.. बदल्या नियमित झाल्या पाहजेत..वाटले तर तो भत्ता देऊ नका..पण बदल्या करा..काही थोड्याफार लोकांच्या सोईसाठी इतर सर्वांची गैरसोय होऊ नये..नियम म्हणजे नियम…

  7. विनंती बदली करावी, कर्मचारयांच्या अडचणी लक्षात घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *