
| मुंबई | अजित पवारांसोबत मी जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याचे शिल्पकार अमित शाहच होते असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचे नेते आहेत. मात्र आम्ही अर्ध्या रात्री फोन करु शकतो ते अमित शाह यांना. कारण सगळ्या गोष्टी आम्ही मोदीजींपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे आमचा खूप चांगला संपर्क आहे. तसंच मागची पाच वर्षे आणि आजही आमच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहेत असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ‘कोलाज विथ राजू परुळेकर’ या मुलाखतीत ते बोलत होते.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शपथविधीची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. कारण शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेतला होता. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जेव्हा शिवसेनेला पाठिंबा द्यायचं नक्की केलं तेव्हा अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा घेतलेला निर्णय आज मागे वळून पाहतो तेव्हा तो नसता घेतला असता तर चाललं असतं. मात्र त्यावेळी तो मला योग्य वाटला होता. पाठीत सगळेच खंजीर खुपसत असल्यावर राजकारणात जिवंत राहण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
त्यावेळी अमित शाह यांना काय घडलंय याची अर्ध्या रात्री कल्पना दिली होती. त्यानंतर त्यांनी आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी घडल्या. पहाटे अजित पवारांसोबत जो शपथविधी झाला त्याचे शिल्पकार अमित शाह हेच होते असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
दरम्यान या मुलाखती मध्ये फडणवीसांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली आहेत. त्यांच्या मनातली सल देखील त्यांनी या मुलाखतीत बोलून दाखवली आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री