| कोल्हापूर | कोरोनाच्या संकटकाळात जिथे गावाच्या वेशी बंद झालेल्या आहेत, स्वकियांसाठी राज्यांच्या सीमा सिल झालेल्या आहेत आणि लोकप्रतिनिधींचे दर्शन दुर्लभ झालेले असताना कोल्हापूर जिल्हातील हातकणंगले मतदारसंघाचे खासदार यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून सर्वांची मने जिंकली असून सर्वत्र त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहेत.
राजु शेट्टी यांच्या सारख्या लढवय्या नेत्याचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळविणारे धैर्यशील माने यांनी होम क्वारंटाईनसाठी आपले संपुर्ण घर उपलब्ध करून दिलेलेआहे. बहुदा देशातील ते पहिले व एकमेव खासदार असतील ज्यांनी स्वतः चे घर क्वारंटाईनासाठी उपलब्ध करून दिले.
हातकंणगले गावातील रूकडी या गावात बाहेरगावाहून परतलेले विद्यार्थी आले असताना त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली जी की निगेटिव्ह निघाली. तरी शासन निर्देशानुसार १४ दिवसांसाठी त्यांना होम क्वारंटाईन होणे महत्वाचे होते. अशा परिस्थितीत रूकडी गावामधील आपला बंगला खा.धैर्यशील माने यांनी विद्यार्थ्यांना होमक्वारंटाईनसाठी उपलब्ध करून दिला.
यापूर्वीही युवा खासदार धैर्यशील माने यांचा धीरोदात्त व लढवय्येपणा कोल्हापुरकरांनी महापुराच्या काळात अनुभवला आहे. मंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या समवेत त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात समाजसेवेचा ठसा उमटवला होता. त्यात या नव्या पायंड्याने देशातील सर्व लोकप्रतिनिधींपुढे खासदार धैर्यशील माने यांनी नवा आदर्श ठेवला आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री