या सेनेच्या खासदाराने घालून दिला असाही आदर्श..!

| कोल्हापूर | कोरोनाच्या संकटकाळात जिथे गावाच्या वेशी बंद झालेल्या आहेत, स्वकियांसाठी राज्यांच्या सीमा सिल झालेल्या आहेत आणि लोकप्रतिनिधींचे दर्शन दुर्लभ झालेले असताना कोल्हापूर जिल्हातील हातकणंगले मतदारसंघाचे खासदार यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून सर्वांची मने जिंकली असून सर्वत्र त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहेत.

राजु शेट्टी यांच्या सारख्या लढवय्या नेत्याचा पराभव करून  ऐतिहासिक विजय मिळविणारे धैर्यशील माने यांनी होम क्वारंटाईनसाठी आपले संपुर्ण घर उपलब्ध करून दिलेलेआहे. बहुदा देशातील ते पहिले व एकमेव खासदार असतील ज्यांनी स्वतः चे घर क्वारंटाईनासाठी उपलब्ध करून दिले. 

हातकंणगले गावातील रूकडी या गावात बाहेरगावाहून परतलेले विद्यार्थी आले असताना त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली जी की निगेटिव्ह निघाली. तरी शासन निर्देशानुसार १४ दिवसांसाठी त्यांना होम क्वारंटाईन होणे महत्वाचे होते. अशा परिस्थितीत रूकडी गावामधील आपला बंगला खा.धैर्यशील माने यांनी विद्यार्थ्यांना होमक्वारंटाईनसाठी उपलब्ध करून दिला.

यापूर्वीही युवा खासदार धैर्यशील माने यांचा धीरोदात्त व लढवय्येपणा कोल्हापुरकरांनी महापुराच्या काळात अनुभवला आहे. मंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या समवेत त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात समाजसेवेचा ठसा उमटवला होता. त्यात या नव्या पायंड्याने देशातील सर्व लोकप्रतिनिधींपुढे खासदार धैर्यशील माने यांनी नवा आदर्श ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *