
| मुंबई | भाजपने राज्यातल्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून साईडलाईनला गेलेल्या नेत्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना सरचिटणीस पद देण्यात आलं आहे. तर विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता या नेत्यांना प्रदेश कार्यकारिणी सदस्य विशेष निमंत्रित पद मिळालं आहे. पंकजा मुंडेंना मात्र कार्यकारिणीमध्ये स्थान मिळालेलं नाही.
पंकजा मुंडे यांना केंद्रात जबाबदारी दिली जाणार आहे, तसंच त्या राज्याच्या कोर कमिटीतही असतील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. पंकजा मुंडेंना राज्यात कोणतंही स्थान मिळालेलं नसलं तरी प्रीतम मुंडे यांची भाजपच्या उपाध्यक्ष पदावर वर्णी लागली आहे.
भाजपची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप महाराष्ट्राच्या नव्या टीमचे अभिनंदन. माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार, असं ट्विट पंकजा मुंडेंनी केलं आहे.
नवीन @BJP4Maharashtra टीम चे अभिनंदन… माझ्या विषयीची भूमिका जाहीर केल्या बद्दल प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil यांचे आभार!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) July 3, 2020
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!