आगळा वेगळा उपक्रम : पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी शिक्षकाचा असाही पुढाकार…!
टाकाऊ बाटल्यांचा वापर करून पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय..

| सोलापूर | लॉकडाऊनच्या काळात माणूस घरात राहत असल्याने निसर्ग खुललाय हे नक्की. पण सध्या उन्हाचा पारा चाळिशीला टेकला आहे. पशू-पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहचत आहेत. अशामध्ये उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असून, मुक्या जिवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन पक्षीप्रेमी, प्राणिप्रेमी करीत आहेत. उन्हाळा आला की आपल्या परिसरातील चिमण्या, पोपट, सातभाई कावळे, दयाळ, मैना, शिंपी, सुर्यपक्षी, साळुंखी, कबुतरे, खारूताई यासह अनेक पक्ष्यांना कडक रणरणत्या उन्हात पाण्यासाठी भ्रमंती करावी लागते. तसेच अनेक पक्षी पाणी व चारा न मिळाल्याने मरण पावतात. कोरोना विषाणु संक्रमणाच्या संकटकाळात सर्वजण घरात राहून आप आपली काळजी घेत असताना अनेकजण निसर्गातील प्राणी पक्ष्यांची काळजी घेताना दिसत आहेत.

 टाकाऊ बाटल्यापासून पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करून एक स्तुत्य उपक्रम सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील शिक्षक सोमनाथ गुंड यांनी राबविला आहे.   ऐन मे महिन्यात उन्हाळ्याच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. कडक उन्हाळ्यात पाण्याचे स्रोत निर्जल होऊन पाणीटंचाई निर्माण होते. माणसाला जशी पाण्याची नितांत गरज आहे, तशी येथील प्राणी-पक्ष्यांनाही त्याची गरज आहे. माणसाला पाणी सहज उपलब्ध होते.परंतु पक्ष्यांना त्यासाठी वनवन भटकावे लागते. पाण्यासाठी पशूपक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असते.

  याचा विचार करत शिक्षक सोमनाथ मच्छिंद्र गुंड यांनी कचऱ्यात फेकलेल्या, इतरत्र पडलेल्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्यांचा पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याकरिता वापर करत एक उपक्रम सुरु केला आहे. पक्ष्यांसाठी झाडांवर पाण्याची सोय केली, त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या टाकाऊ प्लास्टिकच्या बाटलीत पाणी भरून त्या आपल्या घराच्या परिसरातील जवळपास १५ नारळाच्या झाडावर लटकविल्या आहेत व पक्ष्यांसाठी दररोजचे पाण्याचे नियोजन केले आहे. 

त्यामुळे या उपक्रमाचे गाव आणि इतर गावात सुद्धा मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. इतर पक्षीप्रेमींकडूनही सध्याची परिस्थिती पाहता आणि त्यांनी राबवलेल्या उपक्रमाचा आढावा घेता आपण देखील पक्षांच्या अन्न पाण्याची सोय करण्याची गरज आहे.

24 Comments

 1. चांगल्या कामाची अशीच दखल घ्यावी.
  गुंड सरांचे अनुकरणीय कार्य. सलाम आपल्या कार्याला.

 2. अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला सर

  1. आम्ही तुमचे अनुकरण करून पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करू.

 3. स्तुत्य उपक्रम !… worth appreciation… and encouraging .. others to do so…

 4. पशू पक्षी गुणवंत त्याशी कृपा करती भगवंत … त्याप्रमाणे आपले कार्य आहे सर

 5. पशू पक्षी गुणवंत त्याशी कृपा करती भगवंत … त्याप्रमाणे आपले कार्य आहे सर

 6. पशू पक्षी गुणवंत.. त्याशी कृपा करती भगवंत…. त्याप्रमाणे कार्य आहे सर आपले

 7. अतिशय स्तुत्य उपक्रम!
  आपण सर्वांनीच आशा प्रकारच्या उपक्रमाचा भाग झाले पाहिजे आणि ती आजची गरज देखील आहे. आपण जशी आपली आपल्या माणसांची काळजी घेतो तशीच आपण प्राणी , पक्षी यांची देखील काळजी घेतली पाहिजे. दुष्काळात पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या पशु-पक्षांसाठी आशा प्रकारचे उपक्रम सर्वत्रच राबवले गेले पाहिजेत.
  श्री. सोमनाथ गुंड यांनी आशा प्रकारचा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे कितीही कौतुक केले तरी कमीच असेल. त्यांच्या या कार्याला माझा सलाम!!!

 8. श्री. सोमनाथ गुंड यांच्या कार्याला माझा सलाम!!!
  आपण जशी आपल्या माणसांची काळजी घेतो त्याच प्रकारे आपण पशुपक्ष्यांची देखील काळजी घेतली पाहिजे. दुष्काळामुळे पशु प्राण्यांची पाण्यासाठी वन वन होत असते अशा वेळी आपण सर्वांनीच पुढाकार घेऊन अशा प्रकारचे उपक्रम सर्वच ठिकाणी राबवले पाहिजेत.

 9. खूप छान उपक्रम गुंडसर तुमचे कार्य प्रेरणादाई
  आहे

 10. खूप चांगला उपक्रम आहे.संक्रांती ची गाडगी देखील झाडांना बांधता येईल.मी वेल लाव बांधली, कुंडीत ठेवली

 11. खूप स्तुत्य उपक्रम
  सर तुमच्या संवेदनक्षमतेला सलाम
  Keep it up

 12. मुक्या जनावराना तुम्ही जपत आहात त्यामुळे आम्ही तुम्हाला अहो रात्र जपु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *