महाविकास आघाडीतील अजून एक मंत्री कोरोना ग्रस्त..!

| मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकासह अन्य कर्मचारीही बाधित असल्याचे समोर आले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारच्या बैठकीत मुंडे सहभागी झाले होते.

 याआधी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली होती. या दोन्ही मंत्र्यांनी कोरोनावर मात केली.  धनंजय मुंडे हे कोरोनाची बाधा होणारे राज्य सरकारमधील तिसरे मंत्री ठरले आहेत. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

यामध्ये त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी आणि बीडच्या वाहन चालकाचा समावेश आहे. काल रात्री धनंजय मुंडे यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट आला. धनंजय मुंडे यांनी चार दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यात कोरोनाची टेस्टिंग करणाऱ्या प्रयोगशाळेचे उद्घाटन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *