नवलच : लोणार सरोवराचे पाणी झाले गुलाबी..!

| लोणार | एरवी हिरवेगार दिसणारे जगप्रसिद्ध लोणार सरोवर सध्या गुलाबी रंगामुळे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. मात्र, हे निसर्गनिर्मित सरोवर अचानक गुलाबी का दिसू लागले याबद्दल पर्यटकांसह अभ्यासकांतही प्रचंड उत्सुकता आहे. वन्यजीव विभाग याची पाहणी करेल.(pink water of Lonar)

१९८३ नंतर प्रथमच पाणीपातळी घटली. या सरोवरात यंदा १९८३ नंतर प्रथमच पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे खाऱ्या पाण्यात वाढणारे जिवाणू प्रचंड प्रमाणात वाढल्याची शक्यता आहे. सरोवरात या काळात विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरिया वाढल्याने त्या निर्माण करत असलेल्या रंगद्रव्यामुळे पाण्याचा रंग गुलाबी दिसत असावा, असे अभ्यासकांचे मत आहे.

दरम्यान तहसीलदार सैदन नदाफ यांनी सरोवराला भेट देऊन पाहणी केली. पाण्याने रंग कशामुळे बदलला, याचे संशोधन सुरू आहे. आधी कोरोना, मग टोळधाड, नंतर चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक संकटांच्या मालिकेत सरोवराचे गुलाबी पाणी आणखी कुठल्या संकटाचे संकेत देत आहे का ? या दिशेनेही काहीनी विचार करायला सुरुवात केली आहे.(pink water of Lonar)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *