भिगवण रोटरी क्लबच्या वतीने कोविड केअर सेंटरला २५ कॉटची मदत..

| इंदापूर / महादेव बंडगर | भिगवण परिसरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व वाढती पेशंटची संख्या लक्षात घेऊन भिगवण आणि परिसरातील नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये काॅट (बेड ) ची आवश्यकता होती. ही आवश्यकता लक्षात घेऊन रोटरी क्लब भिगवण ,रोटरी क्लब डेक्कन जिमखाना, रोटरी क्लब पिंपरी, रोटरी क्लब उद्योगनगरी, या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज भिगवण कोविड सेंटरला 25 नवीन काॅट देण्यात आल्या.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संपत बंडगर, संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, माजी अध्यक्ष प्रदीप वाकसे, प्रवीण वाघ ,डॉक्टर अमोल खानावरे, सरपंच प्रतिनिधी संतोष धवडे, रणजित भोंगळे,संजय खाडे औदुंबर हुलगे, डॉक्टर घोगरे आदी उपस्थित होते.

रोटरीयन मंजु फडके व रोटेरीयन नितीन ढमाले यांचे याकामी विशेष सहकार्य लाभले असे या वेळी सचिन बोगावत यांनी सांगितले. तर कोविड सेंटरला आवश्यक मदत रोटरी क्लबचे माध्यमातून नेहमीच केली आहे. आगामी काळात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठीही मदत करू असे अध्यक्ष संपत बंडगर यांनी याप्रसंगी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.