या राज्यात ५ वी पर्यंत ऑनलाईन शिक्षण देण्यावर बंदी..!

| मुंबई | कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यास थांबू नये यासाठी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. मात्र कर्नाटक राज्याच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेत पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे तसेच एलकेजी-युकेजीचेही ऑनलाईन क्लासेस, शिक्षण ऑनलाईन घेण्याचा निर्णय रद्द केला आहे. खाजगी शाळांना ई क्लासेससाठी फी आकारता येणार नाही. ऑनलाईन क्लासेससाठी सर्वांकडेच सुविधा असेल असं नाही आणि ती दरी वाढू नये असेही प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठीचे सर्व मार्गदर्शक तत्व लवकरच जाहीर केले जाणार आहेत.(no online education in this state)

कर्नाटकचे शालेय शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी ट्विट करुन पाचवीपर्यंत ऑनलाईन क्लासेस बंद असतील, असं सांगितलंय. सातवीपर्यंत बंद करण्याचा प्रस्ताव अनौपचारीक चर्चेत काही कॅबिनेट मंत्र्यांनी दिला होता, मात्र तो निर्णय अद्याप झालेला नाही, असंही त्यांनी म्हटलंय. लहान मुलांना ऑनलाईन शिक्षण दिल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता आहे. त्या अनुषंगाने शासकीय, खासगी, अनुदानीत व विनाअनुदानित शाळांतील पहिली ते पाचवीच्या वर्गातील मुलांचे ऑनलाईन शिक्षण सरकारने रद्द केले आहेत. राज्यात बालवाडी, उच्च बालवाडी आणि प्राथमिक वर्ग (इयत्ता १ ते ५) वर्गातील विद्यार्थ्यांसाठी लाइव्ह व्हर्च्युअल वर्ग घेता येणार नाहीत, असं सुरेश कुमार यांनी सांगितलंय.

कर्नाटक शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते नववी च्या विद्यार्थ्यांसाठी दररोज विविध विषयाची ऑनलाईन वर्ग सुरू केले आहेत. राज्यातील शाळांना सुट्टी असली तरी अनेक खासगी व सरकारी शाळांकडून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पध्दतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत.

 सहा वर्षांपर्यंतच्या मुलांनी रोज एक तासापेक्षा जास्त वेळ स्क्रिन बघनं हितकारक नसल्याचं तज्ञांचं मत आहे. त्यामुळं शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञांशी चर्चा करुन माध्यमिक शाळांसाठीचे ऑनलाईन क्लासेस सुरु राहतील, असं शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी म्हटलं आहे. (no online education in this state)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *