
| मुंबई | महाविकास आघाडी सरकारमधील कुरबुरी किंवा नाराजी संपण्याचं नाव घेत नाहीत. आता काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याचं समजतं. संबंधित मंत्र्यांना न विचारता अधिकारी प्रस्ताव मंजुरीसाठी देत असल्याने अशोक चव्हाण नाराज आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव अधिकाऱ्यांनी अशोक चव्हाण यांना न विचारता मंजुरीसाठी मांडल्याने अशोक चव्हाण संतप्त झाले. अधिकारी परस्पर प्रस्ताव देत असून संबंधित मंत्र्यांनाच गृहत धरत असल्याच्या भावना अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या.
काँग्रेसची नाराजी आणि महाविकास आघाडीतील कुरकुर :
काल (२३ जुलै) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावरुन चांगलेच घमासान झाले असल्याची माहिती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे निर्णय चव्हाण यांना डावलून होत असल्य़ाची तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सध्या नक्की काय आहे कारण:
सध्याच्या खात्यांचं विभाजन होऊन नवीन खाती निर्माण होणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसी यांचं विभाजन करुन नवी खातं निर्माण करण्याचा प्रस्तावही अशोक चव्हाणांना न सांगता आणला होता. आता या विभागांना मंजुरी देण्याची वेळ आली तेव्हा देखील ती फाईल अशोक चव्हाणांसमोर ठेवली नव्हती. त्यामुळे अशोक चव्हाण तीव्र संतापले आणि त्यांनी आपली नाराजी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.
- “आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..