
| ठाणे | ठाणे महानगरपालिकेत सरकारी नोकरीसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. ठाणे महापालिकेत नर्स पदासाठी मोठ्या संख्येने भरती सुरु झाली आहे. नर्सिंगचं शिक्षण घेतलं असल्यास आणि या पदासाठी आवश्यक पात्रता पूर्ण केल्यास नर्स पदासाठी, (GNM and ANM) सरकारी नोकरीसाठी अर्ज करता येऊ शकतो. या रिक्त पदांसाठी उमेदवाराची थेट निवड केली जाणार आहे. Thane Municipal Corporation Recruitment 2020
पद – नर्स (GNM and ANM)
रिक्त जागा – 1830
पात्रता – GNM/B.Sc नर्सिंग डिग्री, ANMमध्ये डिग्री (2 ते 3 वर्षांचा अनुभव)
वयोमर्यादा – नियमानुसार
वेतन – 35 ते 40 हजार रुपये प्रति महिना
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारिख 28 जुलै 2020 आहे.
या पदासाठी उमेदवाराला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागेल. https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html या किंवा https://est.tmconline.in/ या लिंकवर रजिस्ट्रेशन करता येईल. या लिंकवर ऍप्लिकेशन फॉर्म भरुन 28 जुलैपूर्वी सबमिट करावा लागेल.
या भरतीबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार टीएमसीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकतात. यात उमेदवाराची निवड शॉर्ट लिस्टिंग लिखित परीक्षा / कौशल्य चाचणी अर्थात स्किल टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
त्याशिवाय, उमेदवाराला शारीरिक तंदुरुस्ती-फिजिकल फिटनेस आणि वैद्यकीय-मेडिकल फिटनेस असणं देखील महत्त्वाचं आहे. फ्रेशर्स देखील या पदासाठी अर्ज करु शकतात. या रिक्त जागांसाठी काम करण्याचं ठिकाण ठाणे असणार आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री