
| मुंबई | विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार, हे निश्चित झालं असलं तरीही या निवडणुकीतील उत्सुकता अजुनही संपलेली नाही. कारण भाजपने ऐनवेळी विधानपरिषद निवडणुकीसाठी दिलेला चौथा उमेदवार बदलला आहे. भाजपकडून आता डॉ. अजित गोपचडे यांच्याजागी रमेश कराड हे निवडणूक उमेदवार असणार आहेत.
रमेश कराड यांनी काल विधानपरिषद निवडणुकीसाठी डमी उमेदवार म्हणून भाजपकडून अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता भाजपने डॉ. अजित गोपचडे यांना हटवून रमेश कराड यांची उमेदवारी कायम केली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर रमेश कराड यांनी याबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली होती.
‘महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी सोमवारी उमेवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते मा. प्रवीणजी दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपाचे युवा नेते मा. अरविंद पाटील निलंगेकर आणि प्रदीप पाटील खंडापूरकर हे उपस्थित होते,’ अशी फेसबुक पोस्ट कराड यांनी लिहिली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील त्यांना सुरेश धस यांच्या विरुद्ध विधानपरिषदेला उमेदवारी दिली होती. परंतु धनंजय मुंडे यांना झटका देत ते पुन्हा भाजप डेरे दाखल झाले होते. आणि त्यांनी सुरेश धस यांनाच मदत केली होती.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री