भाजपचा यू टर्न : चौथा उमेदवार बदलला..!
डॉ. अजित गोपचडे यांचा अर्ज कापला..!

| मुंबई | विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार, हे निश्चित झालं असलं तरीही या निवडणुकीतील उत्सुकता अजुनही संपलेली नाही. कारण  भाजपने ऐनवेळी विधानपरिषद निवडणुकीसाठी दिलेला चौथा उमेदवार बदलला आहे. भाजपकडून आता डॉ. अजित गोपचडे यांच्याजागी रमेश कराड हे निवडणूक उमेदवार असणार आहेत. 

रमेश कराड यांनी काल विधानपरिषद निवडणुकीसाठी डमी उमेदवार म्हणून भाजपकडून अर्ज दाखल केला होता. त्यानंतर आता भाजपने डॉ. अजित गोपचडे यांना हटवून रमेश कराड यांची उमेदवारी कायम केली आहे. अर्ज दाखल केल्यानंतर रमेश कराड यांनी याबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली होती.

‘महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या नऊ जागेसाठी सोमवारी उमेवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार  भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते मा. प्रवीणजी दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भाजपाचे युवा नेते मा. अरविंद पाटील निलंगेकर आणि प्रदीप पाटील खंडापूरकर हे उपस्थित होते,’ अशी फेसबुक पोस्ट कराड यांनी लिहिली होती. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने देखील त्यांना सुरेश धस यांच्या विरुद्ध विधानपरिषदेला उमेदवारी दिली होती. परंतु धनंजय मुंडे यांना झटका देत ते पुन्हा भाजप डेरे दाखल झाले होते. आणि त्यांनी सुरेश धस यांनाच मदत केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *