#BoycottIPL हा हॅश टॅग सध्या घालतोय धुमाकूळ..!

| मुंबई / क्रीडा प्रतिनिधी | युएईत होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाबाबत आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने रविवारी अधिकृत घोषणा केली. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धे युएईमध्ये खेळवली जाणार आहे. गव्हर्निंग काऊन्सिल बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यात स्पर्धेच्या मुख्य स्पॉन्सर म्हणून VIVO या चिनी कंपनीला कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात २० भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीसीआयने VIVO कंपनीसोबतचा करार मोडावा अशी लोकांची भूमिका होती. सोशल मीडियावर यासाठी दबावही वाढवण्यात आला होता.

सुरुवातीला जनमताचा आदर करत बीसीसीआयने यावर विचार करण्याची तयारी दाखवली. परंतू करोनामुळे सध्या निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती लक्षात सध्याच्या घडीला VIVO कंपनीची स्पॉन्सरशीप कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. VIVO आणि बीसीसीआय यांच्यात ५ वर्षांचा करार झाला असून प्रत्येक वर्षासाठी बीसीसीआयला VIVO कंपनीकडून ४०० कोटींपेक्षा जास्त महसूल मिळतो. बीसीसीआयच्या या निर्णयावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून ट्विटरवर #BoycottIPL हा हॅशटॅग ट्रेंडिंग करत नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *