कोरोनाच्या संकटात भावासोबत भाऊ…!
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांचा एकजुटीचा सूर..!


  • देशातील वेगवेगळ्या नेतेमंडळींच्या एकजुट, राजकीय अभिनिवेश बाजूला..!

मुंबई : कोरोनामुळे देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विशेष उल्लेख केला. कोरोनाविरोधाच्या या लढाईत आपल्याला राज ठाकरे यांची साथ असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. याशिवाय देशातील वेगवेगळ्या नेतेमंडळींच्या एकजुटीचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला.

“कोरोनाच्या संकंटात सगळे पक्षाचे वरिष्ठ नेते राजकारण आणि त्यांचे पक्ष बाजूला ठेऊन एकत्र आले आहेत. हे सर्व नेतेमंडळी हातात हात घालून कोरोनाविरोधात लढत आहेत. मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझं फोनवर बोलणं सुरुच असतं. अमित शहा यांच्याशी आजही माझं बोलणं झालं. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबतही माझं बोलणं झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सोबत आहेत. राज ठाकरे यांचीदेखील मला साथ आहे. सर्वच पक्ष एकत्र आले आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी याअगोदरही जनतेला संबोधित करताना राज ठाकरे यांचा उल्लेख केला होता. राज ठाकरे यांच्याशी आपलं फोनवर बोलणं झालं असून त्यांनी काही सूचना दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर एका पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनीदेखील राज्य सरकारच्या कामांचं कौतुक केलं होतं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *