CA ची परीक्षा रद्द , नोव्हेंबर २०२० ला होणार पुढील परीक्षा

| मुंबई | मे २०२० च्या सीए परीक्षा रद्द करण्यात आल्या असून आता नोव्हेंबर २०२० मध्ये पुढील परीक्षा होणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने शुक्रवारी (3 जुलै) रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पत्रक जारी करुन माहिती दिली.

सुरुवातीला सीए परीक्षा २ मे ते १८ मे दरम्यान होणार होती. मात्र देशभरातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा पुढे ढकलून १९ जून ते ४ जुलै दरम्यान घेण्याचं ठरलं होतं. मात्र त्यानंतरही ही परीक्षा रद्द करुन जुलै ते ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्याचा निर्णय झाला. २९ जुलै ते १६ ऑगस्टदरम्यान ही परीक्षा पार पडणार होती. मात्र आता ही परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *